Rashmi Mane
नवीन वर्षात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. आधार सुपरवाइजर आणि ऑपरेटर पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
दहावी, बारावी आणि ITI पास उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे. ही भरती CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया (आधार) यांच्याकडून केली जाणार आहे. देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ही नियुक्ती होणार असल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
आधार सुपरवाइजर/ऑपरेटर भरती 2026 अंतर्गत एकूण सुमारे 282 पदे भरली जाणार आहेत. ही पदे जिल्हा स्तरावर असल्याने गाव-तालुका पातळीवरील उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, झारखंड, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ यांसह अनेक राज्यांमध्ये ही भरती होणार आहे.
महाराष्ट्रात सुमारे 20 पदे, मध्य प्रदेशात 28, उत्तर प्रदेशात 23 तर पंजाबमध्ये 12 पदे निश्चित करण्यात आली आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे –
• बारावी (12वी) उत्तीर्ण
• दहावी + 2 वर्षांचे ITI
• दहावी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा
तसेच UIDAI मान्यताप्राप्त आधार ऑपरेटर/सुपरवाइजर सर्टिफिकेट अनिवार्य आहे.
या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा जाहीर केलेली नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 असणार आहे.
अर्ज करण्यासाठी CSC ची अधिकृत वेबसाईट cscspv.in येथे भेट द्यावी. VLE (Village Level Entrepreneur) या भरतीसाठी पात्र नाहीत. वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि सरकारी कामाशी जोडलेली नोकरी मिळवण्याची संधी साधा!