Jagdish Patil
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
तर सध्या नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्यासाठी हजारो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
याच राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे नेमके काम काय असते? ते जाणून घेऊया.
शहरातील विविध प्रभागातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरसेवक म्हटलं जातं.
ज्या प्रभागातून ते निवडून येतात तेथील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे नगरसेकांचं प्रमुख काम असतं.
प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणं. तसंच नागरिकांच्या समस्यांवर महापालिकेच्या माध्यमातून उपाय शोधण्याचं काम नगरसेकांचं असतं.
यामध्ये कधी रस्ते, नाले, पाणीपुरवठा, उद्यानाच्या सुविधा देण्यासह त्यांच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा करणे.
तसंच महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आपल्या प्रभागासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांच्या हिताच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
यासह शाळा आणि रुग्णालये यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणं, अशी कामे नगरसेवकांची असतात.