Rashmi Mane
घरगुती LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅस ग्राहकांनी वेळेत Aadhaar e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडी आणि घरगुती दराने गॅस मिळण्यावर परिणाम होऊ शकतो.
गॅस कंपन्यांकडून ग्राहकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू आहे. आधार पडताळणी पूर्ण केल्यास तुमचे गॅस कनेक्शन सुरक्षित राहते आणि सरकारी सुविधांचा लाभ सुरू राहण्यास मदत होते.
अनेक ग्राहकांना SMS, नोटीस आणि गॅस एजन्सीमार्फत e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी हा अंतिम इशाराही देण्यात आला आहे.
वेळेत e-KYC न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच घरगुती दराने सिलेंडर मिळण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
e-KYC साठी आधार कार्ड, LPG ग्राहक क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक असल्यास आधारशी लिंक असलेला मोबाईल आवश्यक आहे. काही ठिकाणी बायोमेट्रिक पडताळणीही केली जाते.
सर्वप्रथम संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप डाउनलोड करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉगिन करून e-KYC किंवा Aadhaar Verification हा पर्याय निवडा.
12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर Face Authentication किंवा OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर पुष्टी संदेश किंवा SMS प्राप्त होईल.
जर तुम्ही अद्याप Aadhaar e-KYC केले नसेल, तर तातडीने प्रक्रिया पूर्ण करा. यामुळे गॅस सबसिडी, घरगुती दराने सिलेंडर आणि इतर सुविधांचा लाभ अखंडपणे मिळण्यास मदत होईल.