हजारो ग्राहकांनी सरेंडर केले LPG कनेक्शन; देशात नेमकं काय घडतंय? वाचा...

Rajanand More

इराण युध्द

इराण युध्दावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी इंधन वाहतूक रेंगाळली आहे. परिणामी, अनेक देशांना त्याचा फटका बसत आहे.

Iran | sarkarnama

भारतात काय स्थिती?

मागील महिन्यात देशातील अनेक भागात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागत होत्या. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पेट्रोल पंपांवरही गर्दी दिसत होती, सध्या या स्थितीत सुधारणा झाली आहे.

Maharashtra LPG Consumption | Sarkarnama

सरकारच्या उपाययोजना

एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत आहे. पीएनजीचा पुरवठा वाढविला असून हे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना एलपीजी सरेंडर करण्यास सांगितले आहे.

LPG cylinder production India | Sarkarnama

किती सिलिंडर सरेंडर?

सरकारच्या आवाहनानंतर ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत असून १९ एप्रिलपर्यंत ३९ हजार २०० पीएनजी ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर केले आहे.

LPG cylinder production India | Sarkarnama

दोन कनेक्शन अमान्य

सरकारने पीएनजीसह एलपीजी कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे एलपीजी कनेक्शन परत करण्याचे प्रमाण वाढत आहे.

LPG cylinder | Sarkarnama

मागणी वाढली

देशात आता पीएनजीची मागणी वाढू लागली असून आतापर्यंत तब्बल ५ लाख ५१ हजारांहून अधिक ग्राहकांनी नव्या कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे.

LPG Cylinder

पाच किलोचा सिलिंडर

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्चपासून आतापर्यंत १८.४५ लाखांहून अधिक ५ किलोचे फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरची विक्री झाली आहे.

LPG ATM India Over US Iran war | Sarkarnama

वितरणात वाढ

एलपीजी सिलिंडरच्या वितरणामध्ये ९२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अनेक वितरकांकडूनही रविवारीही वितरणाचे काम सुरू ठेवले जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.  

LPG cylinder production India | Sarkarnama

NEXT : राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?

येथे क्लिक करा.