Aslam Shanedivan
केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने LPG ग्राहकांसाठी नवा नियम केला आहे.
LPG ग्राहकांना सब्सिडीसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे.
हा महत्त्वाचा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पण ज्यांचे बायोमेट्रिक झाले आहे. त्यांना पुन्हा कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नाही.
तर जे ग्राहक सब्सिडीसाठी बायोमेट्रिक करणार नाहीत त्यांना LPG सिलिंडर मिळेल मात्र तो त्यांना बाजारभावाने घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
सब्सिडीसाठी बायोमेट्रिक करण्यासाठी अनेक पर्याय असून गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडून डिलिव्हरी करता येईल.
संबंधित वितरकाच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिकची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
यासोबतच संबंधित कंपनीच्या अधिकृत ॲपवरून घरबसल्या देखील बायोमेट्रिकची प्रक्रिया करता येते.
यासाठी Indian Oil ONE, HelloBPCL आणि HP PAY हे ॲप उपलब्ध असून मदतीसाठी LPG हेल्पलाइन 1800 2333 555 उपलब्ध आहे.