LPG सिलेंडर बुकिंगमध्ये अडचण येतेय? 'या' नंबरवर तक्रार करा आणि मिळवा झटपट डिलिव्हरी!

Rashmi Mane

LPG सिलेंडर बुकिंगमध्ये अडचण?

इराण- इस्त्रायल युद्धामुळे आजकाल अनेकांना LPG सिलेंडर बुक करताना त्रास होत आहे. बुकिंग केल्यानंतरही डिलिव्हरी उशिरा मिळत असल्याने नागरिकांना वारंवार एजन्सीकडे जावं लागतं. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

बुकिंग का होत नाही?

सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणीचे मुख्य कारण म्हणजे नवीन नियम. सरकारने गॅस स्टॉक व्यवस्थापनासाठी नियम बदलले आहेत. आता एका बुकिंगनंतर पुढील बुकिंगसाठी किमान 25 दिवसांचा गॅप आवश्यक आहे.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

तांत्रिक अडचणीही कारणीभूत

मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटवर एकाच वेळी अनेक लोक लॉगिन करत असल्यामुळे सर्व्हर स्लो होतो. त्यामुळे बुकिंग प्रक्रिया अर्धवट राहते किंवा पूर्ण होत नाही.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

तक्रार कुठे कराल?

जर एजन्सी प्रतिसाद देत नसेल, तर तुम्ही PG Portal वर तक्रार नोंदवू शकता. हा सरकारी प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुमची तक्रार थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचते.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

ऑनलाइन तक्रार करण्याची सोपी पद्धत

PG Portal वर जाऊन तुमची माहिती भरा, समस्या स्पष्ट लिहा आणि सबमिट करा. काही दिवसांतच त्यावर कारवाई होते.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

त्वरित मदतीसाठी हेल्पलाइन

Indane Gas आणि HP Gas साठी 1800-2333-555 या नंबरवर कॉल करा. Bharat Gas साठी 1800-22-4344 हा नंबर वापरा. येथे तुमची तक्रार लगेच नोंदवली जाते.

LPG Cylinder Booking | Sarkarnama

घाबरू नका, गॅस उपलब्ध आहे!

सरकारनुसार देशात LPG चा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अडचण आल्यास योग्य मार्गाने तक्रार करा आणि तुमचा सिलेंडर वेळेवर मिळवा.

LPG cylinder Booking | Sarkarnama

Next : माणिकराव कोकाटेंचा राजकीय वारसा पुढे नेणारी 'सीमंतिनी' ; वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार वाटचाल

येथे क्लिक करा