Ganesh Sonawane
सिन्नरचे आमदार व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे या वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
सीमंतीनी यांनी केव्हाच राजकारण उडी घेतली आहे. त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या (देवपूर गट) माजी सदस्या आहेत.
सध्या त्या सिन्नर विधानसभा मतदार संघात माणिकरावांच्या जनसंपर्काची सगळी कामे बघतात.
संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलेल्या सीमंतिनी यांनी संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे.
याशिवाय मँचेस्टर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे.
उच्च विद्याविभूषित असूनही त्यांनी राजकारणातच करिअर करण्याचे ठरविले.
सध्या त्यांची भविष्यातील सिन्नर तालुक्याच्या नेतृत्वाकडे दमदार वाटचाल सुरू आहे.
आगामी जिल्हापरिषद निवडणुकीसाठी देखील 'त्या' इच्छुक असून सिन्नरच्या सोमठाणे गटातून तयारी करत असल्याचे समजते.