LPG Cylinder Price : सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी, LPG सिलिंडर झाले स्वस्त! पाहा आजचे नवे दर

Rashmi Mane

एलपीजीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या आहेत. त्यामुळे त्याच्या बायप्रॉडक्ट असलेल्या एलपीजीच्या दरातही घसरण झाली आहे.

LPG cylinder price | Sarkarnama

सिलिंडरच्या किमतीत कपात

पार्श्वभूमीवर देशातील सरकारी तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.

कमर्शियल सिलिंडर

एक नोव्हेंबर 2025 पासून या कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात 5 रुपयांची कपात केली आहे.

गरजेनुसार बदल

ऑक्टोबर महिन्यातच या सिलिंडरच्या किमतीत 15.50 रुपयांनी वाढ झाली होती. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या दरांचा आढावा घेतात आणि गरजेनुसार बदल करतात.

LPG Prices Increased | Sarkarnama

सिलिंडरची किंमत

इंडियन ऑईलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा कमर्शियल सिलिंडर आता 1590.50 रुपयांचा झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 1595.50 रुपये होती.

Sarkarnama

घरगुती वापराचे सिलेंडर

मात्र, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर सध्या 853 रुपये इतकाच कायम आहे. हाच दर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या शहरांमध्येही जवळपास आहे.

Sarkarnama

सर्वसामान्य ग्राहकांवर परिणाम

या दर कपातीचा फायदा रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि केटरिंग व्यवसायाचा खर्च कमी होईल आणि त्याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.

LPG cylinder price

मोठी घसरण

या आर्थिक वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मार्च 2025 मध्ये दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1803 रुपये होती.

Sarkarnama

सिलिंडरचे दर स्थिर

सध्या मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये 853 रुपये, कोलकात्यात 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपये एवढा दर कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या महिन्यात तरी दिलासा मिळालेला नाही, पण व्यावसायिक वापरकर्त्यांना थोडा फायदा नक्कीच झाला आहे.

LPG cylinder price

Next : स्वप्न साकार होण्याआधीच आई गेली; पण तिच्या आशीर्वादाने मुलीने घेतली गगन भरारी! संघर्षातून घडलेली हृदयस्पर्शी कहाणी

येथे क्लिक करा