Aslam Shanedivan
अमेरिका-इस्रायलने आणि इराण यांच्यातील युद्ध प्रचंड पेटले असून या युद्धाचा मोठा फटका भारताला बसत असून गॅस तुटवड्याने नागरीक हैराण झाले आहेत.
देशात इंधन आणि गॅस टंचाई दिसून येत असून गॅस तुटवड्याने नागरीक घराबाहेर पडले आहेत. एलपीजी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.
एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार तुटवडा नसल्याचा दावा करत आहेत. मात्र पुरवठा विस्कळीत झाला असून गॅस सिलेंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही.
दरम्यान आता गॅस संकटावर उपाय निघाला असून एलपीजी एटीएम उघडण्यात आला आहे.
हा एलपीजी एटीएम नवी दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा असून हा एक पथदर्शी प्रकल्प आहे.
सध्या या एलपीजी एटीएमवर सेक्टर -33 मधील रहिवासी रिकामे सिलेंडर आणून ते भरून नेतील. तर यासाठी फक्त तीन मिनिटांचा कालावधी लागेल.
हा पथदर्शी प्रकल्प देशातील पहिला असून यशस्वी झाल्यास देशातील अनेक शहरात असे एलपीजी एटीएम सुरू होण्याची शक्यता आहे.
ग्राहकाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करून आलेला ओटीपी एटीएम मशीनच्या की बोर्डवरून टाईप करावा लागेल. यानंतर क्युआर कोडवर UPI किंवा क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करता येईल.
विशेष म्हणजे या एलपीजी एटीएमवर लोखंडी गॅस टाकी नाही तर कंम्पोझिट सिलेंडरचा वापर करता येईल.