Rashmi Mane
ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. महिना सुरू झाल्या झाल्या सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका मिळाला आहे.
सरकारने आजपासून (1 ऑगस्ट 2024) LPG गॅस सिलिंडर महाग केला आहे.
अर्थसंकल्पानंतर ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाले आहेत.
त्यामुळे 1 ऑगस्ट पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी करण्यात आली होती.आता राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे, आता राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे.
मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना मिळणार आहे. तर 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये इतकीच असणार आहे.