Rashmi Mane
1 जून 2025 पासून देशभरात अनेक आर्थिक नियम बदलणार असून, या बदलांचा थेट प्रभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होणार आहे.
1 जूनपासून EPFO चे नवीन पोर्टल येणार त्यामुळे PF काढणे, क्लेम करणे आणि डिटेल अपडेट करणं होणार सोपं. एटीएमसारख्या कार्डाने थेट PF मधून पैसे काढता येणार!
ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2% पर्यंत दंड
युटिलिटी बिल्स, पेट्रोल भरताना अतिरिक्त चार्ज लागू
इंटरनॅशनल वापरावर रिवॉर्ड पॉइंट्स कमी होण्याची शक्यता
फ्री लिमिटनंतर पैसे काढताना जास्त चार्ज लागू
प्रत्येक ट्रान्झॅक्शन महाग होण्याची शक्यता
ATM वापरताना काळजी घ्या!
1 जून रोजी दरात बदल होणार. सबसिडी सिलेंडर वापरणाऱ्या कुटुंबांवर थेट परिणाम. स्वयंपाकाच्या खर्चात वाढ होऊ शकते
6 जूनला RBI ची बैठक
रेपो रेट कमी झाल्यास बँका FD चे दर कमी करू शकतात
आधीच अनेक बँकांनी व्याज कमी केलंय
1 जूनपासून इनवॉयस नंबर केस-इन्सेंसिटिव्ह. ‘abc’, ‘ABC’, ‘Abc’ – सर्व एकसारखेच समजले जातील. डुप्लिकेट इनवॉयस टाळण्यासाठी उपयुक्त