Mayur Ratnaparkhe
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल आणि गॅस वितरक कंपन्या एपलीपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे १ एप्रिलपासून बदल दिसू शकतो.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती शिवाय सीएनजी आणि पीएनजी किंमतीमध्येही १ एप्रिलपासून बदल दिसू शकतो.
ज्या मोबाईलनंबरशी जुडलेले यूपीआय अकाउंट्स प्रदीर्घ काळापासून अॅक्टीव्ह नाहीत, ते बँक रेकॉर्ड्सवरून हटवले जातील.
रुपे डेबिट सेलेक्ट कार्डमध्ये काही मोठे अपडेट्स करणार आहे, जे १ एप्रिल पासून लागू होतील. यामध्ये फिटनेस, वेलनेस, प्रवास आणि मनोरंजन यांचा समावेश आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच १ एप्रिलपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देणारी यूनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजेच UPSची सुरुवात होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना दिलासा देत सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील बदलापासून टीडीएस, टॅक्स रिबेट आणि अन्य बाबींचा समावेश होता. हे सर्व बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.
याशिवाय TDSच्या नियमात देखील अपडेट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अनावश्यक कपातीस कमी करणे आणि करदात्यांसाठी कॅश फ्लोमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध वर्गांमध्ये लिमिट वाढवली गेली आहे.
क्रेडिट कार्डशी निगडीत नियम -
1 एप्रिल 2025 पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होत आहेत. जे त्यांच्यावर मिळणाऱ्या रिवॉर्डपासून अन्य सुविधांवर परिणाम करतील.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह अन्य अनेक बँक ग्राहकांच्या बचत खात्यांमध्ये किमान बॅलन्सशी निगडीत नियमात बदल करणार आहेत.
नॅशनल हायवे ऑथरेटी आज म्हणजेच 31 मार्च मार्च्या मध्यरात्रीपासून टोल टॅक्सच्या दरात वाढ करू शकते. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या हायवे प्रवासावर होईल.