पोलीस दलाला 10 वर्षांतच रामराम; मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्यानंतर डॅशिंग महिला अधिकारी थेट राजकारणात

Rajanand More

मणिपूर काँग्रेस

मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींना काँग्रेसकडून पक्षात घेतले जात आहे.

Congress | Sarkarnama

वृंदा देवी

मणिपूर पोलीस दलातील डॅशिंग महिला अधिकारी अशी ओळख मिळविलेली वृंदा देवी यांनी सोमवारी (ता. १४) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह इतर दहा जणही पक्षात दाखल.

Brinda Devi | Sarkarnama

उमेदवारी जाहीर

काँग्रेसमध्ये प्रवेश करताच वृंदा देवी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांची ही राजकारणातील पहिलीच एंट्री नाही.

Brinda Devi | Sarkarnama

पहिल्या निवडणुकीत पराभव

वृंदा देवी यांनी २०२२ मध्येही विधानसभा निवडणूक लढविली आहे. या निवडणुकीत त्या संयुक्त जनता दलाकडून भाजपच्या विरोधात मैदानात उतरल्या होत्या. मात्र, पराभव झाला.

Brinda Devi

स्वेच्छानिवृत्ती

वृंदा देवी या २०१२ च्या तुकडीच्या राज्य पोलीस दलातील अधिकारी होत्या. त्यांनी २०२२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात नवी इनिंग सुरू केली.

Brinda Devi | Sarkarnama

डॅग्जविरोधात मोहिम

वृंदा देवा या अतिरिक्त पोलीस अधिक्षक होत्या. तसेच ड्रग्जविरोधी मोहिमेतही त्यांची महत्वाची भूमिका राहिली. त्यांच्या टीमने ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडले होते.

Brinda Devi | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांशी पंगा

तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते. ड्रग्जशी संबंधित एका व्यक्तीवर कारवाई करू नये, असे त्यांनी सांगितल्याचा आरोप वृंदा यांनी कोर्टात केला होता.

N. Biren Singh | Sarkarnama

वारंवार विरोध

वृंदा देवी या वारंवार मुख्यमंत्र्यांविरोधात विधाने करत होत्या. या कालावधीत त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. चौकशीही करण्यात आली होती. हा वाद सुरू असतानात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Brinda Devi | Sarkarnama

NEXT : कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! नोकरी बदलली तरी 'पीएफ'ची चिंता संपली...

येथे क्लिक करा.