Aslam Shanedivan
राज्याच भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजले जात आहेत. पण चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला
या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, भाजपची काँग्रेस करू नका असे सुनावले
शोभा फडणवीस यांनी यावेळी भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू आहे.
यामुळे आता शोभा फडणवीस कोण असा आता सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे
शोभा फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू असून त्यांनी सावली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या विधानपरिषद व महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या राहिल्या आहेत
मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता.
शोभा फडणवीस त्यांच्यावर डाळ घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावेळी तत्कालीन कृषीमंत्री शशिकांत सुतार, मंत्री महादेव शिवणकर, बबनराव घोलप यांना देखील पद सोडावे लागले होते.
दरम्यान सावली मतदारसंघाचे पुनर्रचना झाल्यानंतर ही जागा त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सोडत आपण विधानपरिषदेवर गेल्या होत्या.