Uttam Jankar : उत्तम जानकरांमुळे मोहिते पाटलांचंं वाढलं बळ, तर निंबाळकरांचं टेन्शन!

Deepak Kulkarni

मोहिते गटात एन्ट्री...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ऑफर धुडकावत आणि 30 वर्षांची राजकीय शत्रुत्व संपवत उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील गटात एन्ट्री घेतली आहे. 

Uttam Jankar | Sarkarnama

30 वर्षांचं राजकीय शत्रुत्व मिटलं

माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते वेळापूरमध्ये एकत्र आलेले दिसून आले.

Uttam Jankar | Sarkarnama

फडणवीसांची मध्यस्थी...

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना महायुतीत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

Uttam Jankar | Sarkarnama

विधानसभेचा शब्द

एवढेच नाहीतर चक्क माळशिरसमधून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देत निवडून आणण्याची ऑफरसुद्धा दिली. 

Uttam Jankar | Sarkarnama

निंबाळकरांची आशा मावळली

या भेटीनंतर जानकर रणजितसिंह निंबाळकरांना साथ देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

Uttam Jankar | Sarkarnama

Uttam Jankar पक्षप्रवेशाची चर्चा...

पण काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा एकदा थेट शरद पवारांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा होती.

Uttam Jankar | Sarkarnama

मनधरणी करण्यात अपयश

जानकरांची मनधरणी करण्यात फडणवीसांना सपशेल अपयश आल्याचे पाहायला मिळाले.

Uttam Jankar | Sarkarnama

जानकरांचा पॅटर्न

आता जानकरांनी नवा प्रयोग राबवतानाच अजित पवार गटात राहून धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांची वाट खडतर झाली आहे.

R

Uttam Jankar | Sarkarnama

NEXT: शक्तिप्रदर्शन करत नारायण राणेंनी भरला उमेदवारी अर्ज, किरण सामंतही उपस्थित