Deepak Kulkarni
भाजपने अनेकांचा विरोध डावलून माढ्यातून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.
रणजितसिंह निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर गट अस्वस्थ झाला आहे.
त्याच धर्तीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला राम-राम करत पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे.
पण आता मोहिते पाटलांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत नाराजीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
आयत्या उमेदवाराला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्यामुळे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप हे नाराज झाले आहेत.
शरद पवार आणि पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नसल्याची खदखद ही अभयसिंह जगताप यांनी बोलून दाखवली.
वरकुटे- मलवडी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांच्या भावना ऐकल्यानंतर अपक्ष लढायच की पक्षातून? याचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माढा मतदारसंघाचे प्रश्न डोक्यात घेऊन, देशपातळीवरील प्रश्न विचारात घेऊन मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपण पक्षातून लढायचं की जनतेतून? याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल.