Vijaykumar Dudhale
उत्तम जानकर हे भाजपच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. माळशिरसमध्ये भाजप रुजविण्यात जानकरांचा सुभाष पाटील यांच्यासह मोठा वाटा आहे.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर 2014 च्या निवडणुकीपूर्वी उत्तम जानकर यांनी रान उठविले होते. विविध आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा लढला होता.
उत्तम जानकर हे 2019 पर्यंत भाजपचे खंदे समर्थक होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम केले होते.
लोकसभेनंतर झालेल्या 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जानकर यांच्याऐवजी राम सातपुते यांना तिकीट दिल्याने त्यांनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माळशिरसमधून लढलेली विधानसभेची निवडणूक जानकर अवघ्या 2590 मतांनी हरले होते.
गेली पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले जानकर यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून चाचपणी झाली. मात्र, त्यांना तिकीट न देता पुन्हा सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.
सत्ताधारी भाजपकडून ताकद मिळत नसल्याने तसेच सोलापूरमधून तिकीट न मिळाल्याने नाराज उत्तम जानकर यांनी विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे.
मोहिते पाटील यांना लोकसभेला मदत करून विधानसभा उमेदवारीच्या अटीवर जानकर आणि मोहिते पाटील एकत्र येऊ शकतात. मात्र, त्यासाठी मोहिते पाटील यांना विधानसभेसाठी जानकर यांना शब्द द्यावा लागणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.