Chetan Zadpe
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्री राजमाता माधवीराजे शिंदे यांनी आज सकाळी 9.28 वाजता दिल्लीतील एम्स हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला.
राजमाता माधवीराजे शिंदे या मूळच्या नेपाळच्या. त्या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा जुद्द समशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते.
1966 मध्ये माधवराव शिंदे यांच्याशी माधवी यांचा विवाह झाला होता.
विवाहापूर्वी राजमाता माधवीराजे शिंदे यांचे नाव राजकुमारी किरण राजलक्ष्मी देवी होते.
माधवरावांच्या आकस्मिक निधनामुळे लोक भावुक झाले होते, पण माधवीराजे यांनी स्वत:ला राजकारणापासून कायमच दूर ठेवले होते.
लग्नानंतर मराठी परंपरेनुसार नेपाळच्या राजकन्येचे नाव बदलण्यात आले. किरण राजलक्ष्मी हे नाव बदलून त्यांना माधवीराजे म्हटले जाऊ लागले.राजक
माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर माधवीराजे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात होते.
माधवीराजे यांनी स्वत:ला राजकारणापासून कायमच दूर ठेवले होते. तसेच माधवराव सिंधिया यांचा राजकीय वारसा मुलगा ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवला.