Madhu Dandavat : बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा नाकारला, 'हा'नेता झाला असता पहिला मराठी पंतप्रधान!

Roshan More

रेल्वे टर्मिनसला नाव

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधु दंडवते नाव देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. याविषयी केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात येणार आहे. राज्यमंत्रिमंडळाने याला मंजूरी दिली आहे.

Madhu Dandavat

माजी रेल्वेमंत्री

1977 मध्ये मोरारजी देसाई सरकारमध्ये मधू दंडवते हे रेल्वेमंत्री होते. तसेच व्ही पी सिंग सरकारमध्ये ते अर्थमंत्री देखील होते.

Madhu Dandavat | ेोीकोीलोसो

कोकण रेल्वे

कोकण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला त्यांनी परवानगी दिली.

अहमदनगर ते राजापूर

त्यांचा अहमदनगर (अहिल्यानगर) येथे झाला. मात्र, त्यांची राजकीय कारकिर्द कोकणातील राजापूर येथे बहरली. तब्बल पाच वेळा लोकसभेला राजापूर मतदारसंघाचे नेतृत्व केले.

कट्टर समाजवादी

दंडवते हे समाजवादी विचारसरणीचे होते. काँग्रेस विरोधात ते लढले. जनता दल, प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केले.

आंबेडकरांनी राजीनामा नाकारला

दंडवते हे सिद्धार्थ काॅलेजमध्ये प्राध्यापक होते. सत्याग्रह करण्यासाठी त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो स्वीकाराला नाही.

आंबेडकरांकडून कौतुक

राजकीय काम करतानाच फिजिक्स उत्तम शिकविणाराही प्राध्यापक मला हवा आहे. तू राजीनामा देण्याचे कारण नाही,असे आंबेडकरांनी त्यांना सांगितले. याविषयची आठवण ग.प्र.प्रधान यांनी आपल्या 'साधने'तील एका लेखात सांगितली.

Dr. B. R. Ambedkar

पंतप्रधानपद हुकले...

मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी राहिलेले सतीश पाटणकर यांनी एका लेखात म्हटले की, १९८९ ला पंतप्रधान होण्याची पहिली संधी प्रा. मधू दंडवते यांना चालून आली होती. तेव्हा ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते.मात्र,त्यांनी या पदावर दावा सांगितला नाही.

NEXT : काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्याला मोठं गिफ्ट; आता ‘ऑपरेशन तुफान’मुळे चर्चेत!

Ramesh Chennithala
येथे क्लिक करा