सरकारनामा ब्यूरो
चर्चेत असणाऱ्या डॉ. सलोनी सिदाना या मध्य प्रदेशातील मंडलाच्या कलेक्टर आहेत.
मूळच्या जलालाबादच्या असून, त्यांना शालेय जीवनापासूनच विज्ञानाची आवड होती म्हणून त्यांना डॉक्टर व्हायचे होते.
करिअरसाठी अमेरिकेला गेलेल्या सलोनी यांना त्यांच्या वडिलांनी परत बोलावले होते. 'मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,' असे त्यांनी म्हटले होते.
एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी यूपीएससी करण्याचे ठरवले.
पहिल्याच प्रयत्नात 74व्या रँकसह त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. करिअरसोबतच त्या लग्नामुळेही चर्चेत राहिल्या आहेत.
ट्रेनिंगनंतर त्यांना आंध्र प्रदेश केडर मिळाले होते. त्यानंतर मध्य प्रदेश केडरमध्ये त्यांची बदली झाली.
मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. तिथल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या लोकप्रिय अधिकारी आहेत.
मध्य प्रदेश केडरच्या आयएएस IAS आशिष वशिष्ठ यांच्याशी 500 रुपयांत साधेपणाने केलेल्या कोर्ट मॅरेजमुळे त्या अधिक चर्चेत आल्या.
शाळांच्या तपासणीदरम्यान शालेय भोजन तयार करणाऱ्या कर्मचारी महिलांना त्यांनी जेवणास बसवले. तेव्हाही त्या चर्चेत आल्या होत्या.
R