सरकारनामा ब्यूरो
सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाला भारतातील वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या.
जगातील चौथी सर्वात श्रीमंत आई आणि नऊ मुले असलेल्या त्या एकमेव अब्जाधीश आहेत.
जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन आणि इमेरिटस सावित्री जिंदाल यांची मुले या ग्रुपच्या कंपनीचे चार विभाग चालवतात.
आसामच्या तिनसुकिया शहरातील सावित्री यांनी जिंदाल ग्रुप या स्टील आणि पॉवर समूहाचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्याशी विवाह केला.
पतीच्या आकस्मिक निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाचा व्यवसाय पुढे नेला.
पतीनंतर अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिंदाल समूहाची उलाढाल चार पटीने वाढली आणि त्याचा परदेशातही त्यांनी विस्तार केला.
पतीच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणातही प्रवेश केला. हरियाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा विजय मिळवला.
राजकीय कार्यकाळात त्यांनी महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तसेच शहरी स्थानिक स्वराज्य मंत्रिपदे सांभाळली.
साधेपणाने आणि सांस्कृतिक विचारांनी भरलेल्या सावित्री या आज अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय महिलांपैकी एक आहेत.
R