Rajanand More
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा कुणाल आणि भोपाळमधील रिध्दी जैन यांचा नुकताच साखरपुडा झाला.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवराज सिंह हे प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे साधेपणाने हा सोहळा पार पडला.
रिध्दीचे वडील संदीप जैन हे आदित्य बिर्ला कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. तर आजोबा इंद्रमल जैन हे इराणधील शाही घराण्याचे डॉक्टर होते. अनेक वर्षे इराणमध्येच होते.
रिध्दी आणि कुणाल यांचा प्रेमविवाह आहे. शालेय जीवनापासूनच त्यांची मैत्री होती. अमेरिकेत एकत्र शिकायला होता. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
कुणाल हे राजकारणापासून दूर आहेत. वडीलांचा वारसा मोठे बंधू कार्तिकेय हेच लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुणाल हे डेअरी व्यवसायात रमले आहे. ते सुंदर फुड्स अँड डेअरी ही कंपनी चालवतात. पुर्णपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित.
कुणाल यांचे मोठे बंधू कार्तिकेय हे राजकारणात सक्रीय आहेत. वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीत ते प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात.
सिंह आणि जैन कुटुंबात आता विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विवाह होणार असल्याचे सांगितले जाते.