Ramniwas Ravat News : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का देणारे रामनिवास रावत कोण?

सरकारनांमा ब्यूरो

मध्य प्रदेशातीलच काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री रामनिवास रावत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Ramniwas Ravat

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत रावत यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.

Ramniwas Ravat

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Ramniwas Ravat

रावत यांनी विजयपूर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा आमदार झाले आहेत.

काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढवली होती.

राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले रावत (Ramniwas Rawat) हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात

रामनिवास रावत प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी विचार न झाल्याने ते मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती.

NEXT : राजधानीत काँग्रेसचा सेनापती बदलला; कोण आहेत दिल्लीचे नवे अध्यक्ष देवेंद्र यादव?