Lok Sabha Election 2024 : राजधानीत काँग्रेसचा सेनापती बदलला; कोण आहेत दिल्लीचे नवे अध्यक्ष देवेंद्र यादव?

Chetan Zadpe

लवली यांचा राजीनामा-

अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र यादव यांची हंगामी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024

मोठी जबाबदारी -

देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष असण्यासोबतच ते पंजाबचे पक्ष प्रभारीही आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

Lok Sabha Election 2024

दीर्घ अनुभव -

देवेंद्र यादव 2008 ते 2015 दरम्यान दोन वेळा बदली, दिल्ली येथून आमदार राहिले आहेत. पंजाबचे प्रभारी नियुक्त होण्यापूर्वी ते उत्तराखंडचे प्रभारीही होते.

Lok Sabha Election 2024

हायकमांडकडून शिक्कामोर्तब -

ते माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचे निकटवर्तीय मानले जातात. लवली यांच्या राजीनाम्यानंतर राजेश लिलोथिया यांनाही दावेदार मानले जात होते. मात्र आता हायकमांडने देवेंद्र यादव यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

दोन वेळा आमदार -

देवेंद्र यादव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, देवेंद्र यांनी 2008 आणि 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

कमिटीचे सदस्य -

देवेंद्र हे काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीचे सदस्यही आहेत.

पंजाब प्रभारी -

याशिवाय पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. देवेंद्र यादव सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रभारी आहेत.

NEXT : देवेगौडांनंतर यादव अडचणीत; आदित्य यांचे मैत्रिणींसोबतचे फोटो व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा..