IPS Sachin Sharma: नुसता व्यायाम! हे 'फिटनेस फ्रिक आयपीएस' फक्त चारच तास झोपतात...

सरकारनामा ब्यूरो

सोशल मीडियावर फेमस

आपल्या फिटनेसमुळे आयपीएस सचिन शर्मा हे सोशल मीडियामुळे खूप फेमस झाले आहेत.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

कंबरेला टायर बांधून धावतानाचा व्हिडिओ मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे देशभर त्यांना प्रसिद्धी मिळाली.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

तंदुरुस्त अधिकारी

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सचिन शर्मा हे सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळी सलग व्यायाम करतात.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

मध्य प्रदेश केडर

मध्य प्रदेश केडरचे अधिकारी आयपीएस सचिन शर्मा हे छतरपूर जिल्ह्यात एसपी होते. सध्या ते उज्जैनमध्येही त्याच पदावर तैनात आहेत.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

कामाची अनोखी स्टाइल

कामातील अनोख्या स्टाइलमुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या कारवाईनंतर छतरपूरमधील बड्या गुन्हेगारांनी स्वत:हून आत्मसमर्पण केले होते.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

छापे टाकण्यात तरबेज

जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकण्यातही ते तरबेज आहेत. त्यामुळे चुकीच्या गोष्टींवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

रोज व्यायाम

अधिकारी असतानाही आपल्या फिटनेसकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यासाठी छतरपूर पोलिस लाइनच्या ग्राउंडवर ते अजूनही रोज व्यायाम करतात.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

4 ते 5 तास झोप

रात्री 12:30 ते 1 च्या दरम्यान झोपतात आणि भल्या पहाटे 5 च्या आधी उठून ग्राउंडवर जातात.

IPS Sachin Sharma | Sarkarnama

ऑफिसव्यतिरिक्त फक्त व्यायामच

आठ वाजेपर्यंत ते फक्त एक्सरसाइजच करतात. ऑफिसहून आल्यानंतरही सात वाजता पुन्हा मैदानावर जाऊन रात्रीपर्यंत ते सलग व्यायामच करतात.

R

IPS Sachin Sharma | Sarkarnama

Next : परभणीतून फुंकले लोकसभेचे रणशिंग

येथे क्लिक करा