Aslam Shanedivan
मध्य प्रदेशच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सध्या एका आयएएस अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा होत असून तो थेट मंत्र्यालाच नडल्याचे समोर येत आहे.
तर बदली प्रक्रियेत केलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी केला आहे.
याबाबत विभागाचे सचिव मनमानी करत असल्याची तक्रार कुशवाह यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि मुख्य सचिव अनुराग जैन यांच्याकडे केली आहे.
यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये हा आयएएस अधिकारी कोण अशी चर्चा होताना दिसत असून त्यांचे नाव जॉन किंग्जली असे आहे.
मंत्री कुशवाह यांनी केलेले आरोप फेटाळत सर्व निर्णय नियमांनुसारच घेतल्याचे म्हटले आहे.
आयएएस जॉन किंग्जली हे २००४ च्या AIR बॅचचे वरिष्ठ अधिकारी असून ते मध्य प्रदेश कॅडरचे आहेत.
सध्या ते मध्य प्रदेशचे फलोत्पादन व अन्न प्रक्रिया विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
हा वाद विभागातील बदल्यांवरून झाला. खात्याचे मंत्री कुशवाह यांच्यासह तीन आमदार आणि प्रदेश भाजप अध्यक्षांनी काही नावे सुचवली होती. जी किंग्जली यांनी वगळल्याचा आरोप आहे.