Rashmi Mane
डॉ.मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. बुधवारी त्यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. मोहन यादव यांनी उज्जैन जिल्ह्यातील उज्जैन दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
58 वर्षीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 42.04 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
2018 च्या निवडणुकीत त्यांनी एकूण 31.97 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
डॉ. मोहन यादव यांनी शपथपत्रात 1,41,500 रुपये रोख असल्याचे म्हटले आहे.
मोहन यादव यांच्या पत्नीकडे 15 लाख रुपये किमतीचे 250 ग्रॅम सोने आणि 78 हजार रुपये किमतीचे 1.2 किलो चांदी आहे.
यादव यांच्याकडे 80 हजार रुपयाची रिव्हॉल्व्हर तर 8 हजार रुपये किमतीची 12 बोअरची बंदूक आहे.
5.66 कोटी रुपये, पत्नी सीमा यांच्या नावावर 1.09 कोटी रुपये जंगम मालमत्ता आहे.