Rajanand More
रिती पाठक या भाजपच्या आमदार आहेत. मध्य प्रदेशातील सीधी विधानसभा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात.
मतदारसंघातील रुग्णालयासाठी मंजूर झालेला सात कोटी रुपयांचा निधी कुठे गेला, असा जाब पाठक यांनी उपमुख्यमंत्री राजेेंद्र शुक्ला यांना स्टेजवरच विचारला होता.
पाठक यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
सीधी लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 असे दोनदा त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.
रिती पाठक यांना भाजपने 2023 च्या विधानसभा निवडणुकीत उतरले. तिथेही त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
राजकारणात येण्यासाठी पाठक यांनी सीधीमध्ये महिलांसाठी सामाजिक कार्य केले. नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि अध्यक्ष बनल्या.
पाठक या उच्चशिक्षित असून इतिहासात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी विधी शाखेची पदवीही मिळवली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधातील काँग्रेस उमेदवाराने पाठक यांचा उल्लेख माल असा केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रिती पाठक प्रकाशझोतात आल्या होत्या.