Mahadev Babar - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का देणारे महादेव बाबर कोण?

Mayur Ratnaparkhe

माजी आमदार

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत.

Mahadev Babar | sarkarnama

उमेदवारी न मिळाल्याने नाराज

विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्याला हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळावं यासाठी महादेव बाबर आग्रही होते

Mahadev Babar | sarkarnama

जागा पक्षाला सुटली नाही -

मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने माजी आमदार असलेले महादेव बाबर हे नाराज होत.

Mahadev Babar | sarkarnama

पहिल्यांदा नगरसेवक -

महादेव बाबर हे  1997 मध्ये पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडले गेले होते.

Mahadev Babar | sarkarnama

दुसऱ्यांदा नगरसेवक -

यानंतर पुन्हा 2002 मध्ये महादेव बाबर नगरसेवक झाले होते.

Mahadev Babar | sarkarnama

पहिल्यांदा आमदार -

2009 च्या विधानसभा निवडणुकीत महादेव बाबर यांचा विजय झाला होता.

Mahadev Babar | sarkarnama

मोदी लाटेत पराभूत -

यानंतर 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मोदी लाटेत महादेव बाबर यांचा पराभव झाला होता.

Mahadev Babar | sarkarnama

एकनाथ शिंदेंकडे जाण्याची चर्चा -

महादेव बाबर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होती, परंतु ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

Mahadev Babar | sarkarnama

Next - अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम

Nargis Khan | Sarkarnama
येथे पाहा