Mayur Ratnaparkhe
राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.
जानकारांच्या या तयारीमुळे महायुतीमधील नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.
विशेषतः गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची घालमेल होताना दिसत आहे.
महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणासोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
महादेव जानकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारास बसू शकतो.
महादेव जानकर यांची वेगळी भूमिका आणि भाजपा नेत्यांशी असणारे घनिष्ठ संबंध यामुळे गुट्टे यांची घालमेल होताना दिसून येत आहे.
महादेव जानकरांच्या परभणीती शक्तीप्रदर्शनाकडे सर्वांचेच लक्ष लागले असणार आहे.
Next : 'जनतेचा रेट्या समोर कितीही मोठा हुकूमशहा असेल तर तो टिकत नाही' ; उद्धव ठाकरेंचा घणाघात!