Chetan Zadpe
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मिठी मारल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. याची एकच तुफान चर्चा होत आहे.
मागील काही दिवसांत अजित पवार आणि महादेव जानकर यांच्यात राजकीय टीका-टिप्पणी झाली. मात्र, आज त्यांनी त्यांच्याशीही राजकीय समीकरण जुळवून घेतले.
वर्षा या निवासस्थानी जानकरांनी महाविकास आघाडीला चकवा देत, महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
महायुतीत सामील होताना त्यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.
जानकर यांच्या रासप पक्षाचे परभणीच्या गंगाखेडमध्ये मतदारसंघातून आमदार आहेत. या मतदारसंघात त्यांची चांगली ताकद आहे.
R