सरकारनामा ब्यूरो
विनायक राऊत हे शिवसेनेचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात.
1985 ते 1992 पर्यंत मुंबईच्या बीएमसीचे कौन्सिलर म्हणून त्यांनी काम पाहिले.
शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतील विले-पार्लेमधून विधानसभेत 1999-2004 मध्ये त्यांची निवड झाली.
2012 मध्ये शिवसेनेकडून महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिल्यांदा सदस्य म्हणूनही निवडून आले.
राऊत यांनी 16व्या आणि 17व्या लोकसभेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची खंबीर साथ दिली.
आक्रमक स्वभाव, अभ्यासू व्यक्तिमत्त्व अन् रोखठोक वक्तव्यासाठी ते ओळखले जातात.
कोणत्याही परिस्थितीत पक्षाची बाजू मांडतानाच राणे पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
R