Jagdish Patil
CM फडणवीसांच्या आदेशानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमण्यात आली आहे.
कुमावत यांनीच या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी जोर धरत होती. त्यांच्या नियुक्तीमुळे या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर धडाकेबाज आणि डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले आणि वाल्मिक कराड यांना नको असलेले पंकज कुमावत नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
IPS अधिकारी असलेले कुमावत यांनी बड्या राजकीय नेत्यांच्या गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब उद्वस्त केले होते. या कारवायांमुळेच त्यांची बीडमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
मुळचे राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेल्या पंकज यांचे आई-वडील टेलरींगचे काम करायचे. त्यांचा एक भाऊ IPS तर दुसरा भाऊ डॉक्टर असून त्यांना एक विवाहित बहिण देखील आहे.
4 भावंडांमध्ये मोठे असलेले पंकज यांचा जन्म 22 डिसेंबर 1992 ला झाला. ते शालेय जीवनापासून हुशार होते. दहावीला 88 टक्के तर 12 वीमध्ये त्यांनी 89.60 टक्के गुण मिळवले.
त्यानंतर दिल्ली IIT मधून त्यांनी अभियांत्रिकीची डिग्री मिळविल्यानंतर नोएडातील एका कंपनीमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून 10 लाखांचे पॅकेज असलेल्या नोकरीला सुरुवात केली.
2016 साली UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्यांदा 2017 ला दिलेल्या UPSC च्या लेखी परीक्षेतही पास होत त्यांनी मुलाखतीपर्यंतही धडक मारली.
मात्र, त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर 2018 साली 423 वा रँक मिळवल्यानंतर त्यांना भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडर त्यांना मिळाले. त्यांच्या पत्नी लांची प्रजापत या LLM आहेत.