Rashmi Mane
आता आधार कार्ड मिळवणे झाले आणखीन सोपे. जाणून घ्या ऑर्डर करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
भारतामध्ये आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून सर्वाधिक वापरले जाते. बँक खाते, मोबाईल कनेक्शन किंवा शासकीय योजनेसाठी ते आवश्यक आहे.
UIDAI ने आता आधार कार्डाचे पीव्हीसी (PVC) व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे. हे कार्ड दिसायला एटीएम कार्डसारखेच असते आणि टिकाऊ व आकर्षक असतात.
या कार्डचे फायदे काय तर...
मजबूत प्लास्टिकचे बनलेले
सहज खराब होत नाही
खिशात ठेवणे सोपे
आकर्षक व सुरक्षित
myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या. Order Aadhaar PVC Card हा पर्याय निवडा. आधार क्रमांक/VID टाका. OTP ने व्हेरिफाय करा.
व्हेरिफिकेशननंतर फक्त 50 रुपयाचे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. यानंतर ऑर्डर कन्फर्म होते.
पेमेंट झाल्यानंतर UIDAI कडून कार्ड प्रिंट होऊन पोस्टाने थेट आपल्या पत्त्यावर पाठवले जाते.
फिजिकल कार्डशिवाय ई-आधार देखील तितकाच कायदेशीर आहे. तो PDF स्वरूपात डाउनलोड करून मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ठेवता येतो.