Roshan More
देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्यात
महाकुंभमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार त्रिवेणी संगमात स्नान केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिवेणी संगमात स्नान करण्यापूर्वी सहपरिवार पूजा केली.
संगमात स्नान करतावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात टीशर्ट होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, एक हिंदू म्हणून मीही येथे पवित्र स्नान करण्यासाठी आलो आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाकुंभच्या भव्य आयोजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.
गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर स्नान करून मला अपार शांती आणि समाधान मिळाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबूकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.