सरकारनामा ब्यूरो
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
कॅनाडामध्ये पुढील पंतप्रधान कोण होणार अशी चर्चा सुरु असतानाच या चर्चेमध्ये एका भारतीय महिलेचे नाव समोर येत आहे. तर कोण आहेत त्या जाणून घेऊयात..
कॅनडातील नोव्हा स्कॉशिया येथे जन्मलेल्या अनीता आनंद असं त्यांचं नाव आहे. त्यांचे वडील तमिळनाडूचे आणि आई पंजाबची होती.
अनिता यांनी क्वीन युनिव्हर्सिटीतून राज्यशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या ऑक्सफर्डमध्ये गेल्या. डलहौसी या युनिव्हर्सिटीमधून कॅनेडियन कायद्याची पदवी त्यांनी घेतली आहे.
2019 ला फेडरल निवडणुकीपासून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ओकविलेचे प्रतिनिधित्व करत त्यांनी कबिनेटमध्ये प्रवेश केला.
2019 ते 2021 या कालावधीत त्यांनी लिबरल पार्टीचे सदस्य, सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री, राष्ट्रीय संरक्षण मंत्री म्हणून कामकाज पाहिले.
त्यांनी कॅनडाच्या संरक्षण क्षेत्रात बऱ्याच सुधारणा केल्या त्यामुळे त्या खुप चर्चेत आल्या होत्या. यामुळे त्यांची नियुक्ती कॅबनेट मंत्री म्हणून करण्यात आली.
2024 पासून त्या परिवहन आणि व्यापार मंत्री या पदावर कार्यरत आहेत.