Jagdish Patil
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील रेमंड कंपनी आणि 'सुपर क्लब' आयोजित 'ऑटोफेस्ट-2025' या ऑटो कार फेस्टिव्हलला भेट दिली.
यावेळी त्यांनी अनेक दुचाकी व चारचाकी गाड्या पाहण्याचा आणि चालवण्याचा आनंद घेतला.
तसंच त्यांनी रिव्हेको प्युअर जिटी ही बाईक चालवण्याचाही आनंद यावेळी घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
या प्रदर्शनात 580 वाहनं ठेवण्यात आली होती. हे प्रदर्शन मुंबई प्रमाणे ठाण्यात भरवण्यात येत असून ती अभिमानास्पद बाब असल्याचं DCM शिंदे म्हणाले.
तर अशा प्रदर्शनामुळे शंभर ते दिडशे वर्ष जुनी अँटीक वाहने जवळून पाहण्याची आणि चालवण्याची संधी मिळते असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी रिक्षा चालवून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला.
एक्सवर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं, "ज्या वाहनातून मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली ती रिक्षा मी चालवली आणि छान फेरफटकाही मारला."