Jagdish Patil
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेत्यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली.
राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांना अभिवादन केलं.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांनी चैत्यभूमी परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या अन्नदान सेवा केंद्राला भेट दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं.
तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी चैत्यभूमी येथे समता सैनिक दलाच्या वतीने ध्वजारोहण केले.