Jagdish Patil
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 वर्षांनंतर भारतात आलेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे.
अशा हाय-प्रोफाइल नेत्यांचे दौरे सामान्य माणसांच्या चर्चेचे विषय असतात. या चर्चेत नेत्यांची सुरक्षा आणि जेवणाचा समावेश असतो.
नेत्यांच्या जेवणात नेमकं काय असतं? हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. यानिमित्ताने पुतीन भारतात आल्यावर काय खाणं पसंत करतात ते जाणून घेऊया.
पुतीन भारतात येतात तेव्हा त्यांचा आहार आणि सुरक्षितता प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्याच्यासाठी एक खास मेन्यू तयार केला जातो.
हे काम भारताच्या विशेष कुकिंग आणि प्रोटोकॉल टीमद्वारे केलं जातं. पुतीन यांच्या जेवणातील प्रत्येक पदार्थ अनेकदा तपासला जातो.
2014 मध्ये पुतीन भारतात आले तेव्हा त्यांच्या जेवणाची सुरुवात कहवाने झाली. जे केशरापासून बनवलेले काश्मीरचे खास पेय आहे.
यावेळी मांसाहारी मेन्यू देखील ठेवला होता. ज्यामध्ये मऊ आणि हलके मसालेदार गलौटी कबाब. मुर्ग धनियाच्या ग्रेव्हीमध्ये बनवलेल्या चिकनचा समावेश होता.
जेवणात बदाम शोरबा, मशरूम, पनीर आणि शिजवलेल्या भाज्यांचा समावेश होता.
पुतीन यांच्या 2018 च्या भारत दौऱ्यातील जेवणात सॅल्मन फिलेट्स, कांदा, केशर आणि मसाल्यांसह रोस्टेड लैम्ब आणि चिकनचा समावेश होता.
मात्र, पुतीन यांचा दैनंदिन आहार साधा आहे. ते दिवसाची सुरूवात दलिया आणि कॉटेज चीजने करतात. यासह अंडी, फळांचे ताजे रस आणि मासेही त्यांना आवडतात.