Roshan More
मेवाड राजघराण्यातील 80 वर्षीय अरविंद सिंग मेवाड यांचे 16 मार्च 2025 रोजी सकाळी निधन झाले.ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि उदयपूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अरविंद सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचे वंशज होते आणि मेवाड राजघराण्याचे एक प्रमुख सदस्य होते.
ते मेवाड राजघराण्याचे ७६ वे वंशज आणि एकलिंगजी महादेवचे दिवाण होते. त्यांनी कुटुंबाच्या परंपरा आणि मूल्ये पुढे नेली.
त्यांच्या वडिलांचे नाव भगवंत सिंग मेवाड आणि आईचे नाव सुशीला कुमारी होते. गेल्या वर्षी अरविंद सिंग यांचे मोठे भाऊ महेंद्र सिंग मेवाड यांचे निधन झाले.
त्यांनी उदयपूर येथील महाराणा भूपाल महाविद्यालयातून कला शाखेत पदवी प्राप्त केली होती.
अरविंद सिंग मेवार यांनी प्रतिष्ठित यूके कॉलेज, सेंट अल्बन्स मेट्रोपॉलिटन कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली होती.
२०२१ मध्ये हॉटेलियर इंडियाने यांनी त्यांना प्रतिष्ठित 'लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२१' देऊन सन्मानित केले होते.