सरकारनामा ब्युरो
नंदुरबारचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी आता चौथ्यांदा विधान परिषदेचे आमदार होणार आहेत.
आमश्या पाडवी यांची जागी एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
रघुवंशी यांच्या आमदारकीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या दोन होणार आहे. यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही त्यांचे नाव होते.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असताना चंद्रकांत रघुवंशी यांनी जवळपास 6 वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
1998 साली काँग्रेसकडून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले. 2004 आणि 2014 मध्ये काँग्रेसने त्यांना पुन्हा विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली.
रघुवंशी यांची नंदुरबार शहर आणि परिसरात मोठी ताकद आहे. रघुवंशी यांची पंधरा वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती सत्ता अबाधित आहे.
त्यांच्या पत्नी सलग चार वेळा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांचे चिरंजीव राम रघुवंशी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सदस्य होते.
2022 मध्ये चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार आणि धडगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली.
विजयकुमार गावित यांच्या पॅनेलचा पराभव करत नंदुरबारची बाजार समितीही चंद्रकांत रघुवंशी यांनी जिंकली होती.
रघुवंशी यांच्या माध्यमातून शिंदे यांची गावित कुटुंबियांना टक्कर देण्याची रणनीती असल्याचे दिसते.