Chetan Zadpe
पाकिस्तानी लष्कराकडून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचाऱ्याबाबत तेथील लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
डॉ. महरंग बलोच यांचे नेतृत्व -
पाकिस्तान सरकार अन लष्करशाही विरोधात या महिलांच्या नेतृत्व 30 वर्षीय तरुणी डॉ. मेहरंग बलोच करत आहेत.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. मेहरंग बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाबाहेर धरणे करण्याची घोषणा केली आहे.
मेहरंग बलोच यांची परिसरात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून बलुचांवर होणाऱ्या अत्याचाराचाबाबत त्या नेहमीच आवज उठवतात.
1993 मध्ये बलुच कुटुंबात जन्मलेल्या मेहरंगने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या छळाचे बळी ठरले आहेत. 12 डिसेंबर 2009 रोजी त्याचे अपहरण झाले होते.
मेहरंग बलोच यांनी बलुचिस्तानच्या ग्रामीण भागातील लोकांच्या आरक्षणात कपात केल्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनही केले होते.
बलोच यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बलुचिस्तानमधून 1600 किलोमीटरची यात्रा करून इस्लामाबादला पोहोचला. मूलतत्त्ववादी समाजात बलोच यांचे पिडीत महिलांचे आवाज बनून पुढे येणे ही मोठी आशादायी बाब आहे.