Chetan Zadpe
डाव्या चळवळीतील नेते, कवी, लेखक, अभिनेते, नाटककार सफदर हाश्मींची आजच्या दिवशी (2 जानेवारी 1989) रोजी भर बाजारात हत्या करण्यात आली होती.
सफदर हाश्मी यांचा जन्म १२ एप्रिल 1954 ला दिल्लीत झाला. मार्क्सवादी विचारांचा वारसा घरातूनच मिळाला. शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजीची पदवी परीक्षा उत्तीर्ण. दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीमध्ये एमए उत्तीर्ण..
या दरम्यान हाश्मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच SFI, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ची विद्यार्थी शाखा तसेच भारतीय जन नाट्य संघ (IPTA) मध्ये सामील झाले.
इप्टामधून वेगळे झाल्यानंतर सफदर हाश्मी यांनी जन नाट्य मंच (जनम) नावाची संस्था स्थापन केली. कामगार संघटनांबद्दल सहानुभूती, विद्यार्थी, महिला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात नाटकाच्या माध्यमातून सहभाग...
1 जानेवारी 1989 रोजी ही घटना घडली. गाझियाबादच्या आंबेडकर पार्कजवळ सीपीआय (एम) उमेदवारासाठी हाश्मी पटनाट्य सादर करत होते. हल्ला बोल असे नाटकाचे नाव होते. यावेळी तत्कालीन काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा आपल्या कार्यकर्त्यांसह जात होते. या दरम्यान दोन्ही पक्षात वाद झाला.
नाटक सुरू असताना काँग्रसचे उमेदवार मुकेश शर्मा यांना रस्ता सोडण्यास सांगतले. यावर हाश्मींनी त्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करायला सांगितले. याचा राग शर्मांना इतका आला होता की, त्यांनी समर्थकांसह त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हाश्मी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला हाश्मींची मृत्यूशी लढत अपयशी ठरली. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 34 वर्षांचे होते. दुसऱ्याच दिवशी त्यांची पत्नी मौलीश्री आणि त्यांच्या मित्रांनी आंबेडकर पार्कमध्ये जाऊन तेच नाटक पूर्ण केले.
सफदर हाश्मींच्या मृत्यूच्या 14 वर्षांनंतर गाझियाबाद न्यायालयाने काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांच्यासह एकूण 10 जणांना 2003 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर दरवर्षी 12 एप्रिल हा हाश्मींचा जन्मदिवस पथनाट्य दिवस म्हणून साजरा केला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.