Rashmi Mane
भारतातील राजघराणे आणि त्यांची परंपरा पाहून सगळेच थक्क होतात. मोठ मोठे राजवाडे, परंपरा आणि राजघराण्यांच्या कथा आजही सांगितल्या जातात.
भारताच्या सर्वात सुंदर महाराणी राधिकाराजे गायकवाड. त्यांचे रॉयल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
राधिकाराजे यांचा जन्म वांकानेर येथील महाराजकुमार डॉ.रणजितसिंहजी यांच्या कुटुंबात झाला. 2002 मध्ये बडोद्याचे महाराजा समरजितसिंहराव गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
राजघराण्याशी संबंधित असलेल्या या लोकांचे वैभव पाहून सामान्य माणसं नेहमीच थक्क होतात, पण बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची कहाणी अगदी वेगळी आहे.
वांकानेरच्या राजघराण्यात जन्मलेल्या राधिकाराजे यांचे लग्न बडोद्याच्या महाराजांशी झाले.
राजघराण्याच्या ग्लॅमरमागील खऱ्या आयुष्याबद्दल राधिकाराजे यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
राधिकाराजे म्हणतात की लग्न झाल्यानंतर आणि बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहायला आल्यानंतर त्यांना खरी ओळख मिळाली.