Roshan More
शेतकऱ्याच्या घरी
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथे शेतकरी हणमंत बापुराव लावंड यांच्या घरी भेट देऊन शेतकऱ्यांसमवेत दिवाळीचा फराळ केला.
गोठा पाहिला
कृषिमंत्र्यांनी गाडीतून उतरताच शेतकरी लावंड यांच्या घरासमोरील गाईच्या गोठ्याकडे गेले. त्यांनी लावंड बंधूंकडून जनावरांची माहिती घेतली.
औक्षण
भरणे यांनी शेळ्यांच्या गोठ्याची तसेच कोंबड्यांचीही पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या घरातील सुवासिनींनी भरणे यांचे औक्षण केले.
शेतकऱ्यांशी संवाद
यावेळी त्यांनी घरातील तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर सर्वांसोबत दिवाळी फराळ आणि पोहे घेतले.
भरणे म्हणाले, मी राज्याचा कृषिमंत्री असलो तरी तुम्हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने तुमचे दुःख, या भागातले प्रश्न, अडचणी माहिती आहेत.
ते पुढे म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपये दिवाळीसाठी अग्रीम जमा करण्यात आले आहेत.
एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तसेच एसडीआरएफच्या माध्यमातून, शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
NEXT : दिवंगत अजितदादांचे कट्टर समर्थक ते गोकुळचे अध्यक्ष; कोण आहेत राजेश नरसिंगराव पाटील?