Aslam Shanedivan
नुकताच गोकुळच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून महायुतीने बाजी मारली आहे. तर राजेश पाटील यांची निवड झाली आहे.
दरम्यान नाट्यमय घडामोडीनंतर आज पार पडलेल्या मतदानावेळी शासनाचे ४ संचालकांनी मतदान केले आणि महायुतीचा अध्यक्ष बनला आहे.
गोकुळमध्ये झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे १३ उमेदवार विजयी झालेत. तर महायुतीचे १२
गोकुळचे अध्यक्ष झालेले राजेश पाटील हे दिवंगत अजितदादांसह मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू मानले जातात
राजेश पाटील हे चंदगडचे माजी आमदार दिवंगत नरसिंगराव पाटील यांचे सुपूत्र असून ते देखील याच मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत.
राजेश पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे असून गेल्या वेळी त्यांच्या पत्नी आणि मेहुणे यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांना पराभव झाला होता.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
दरम्यान, जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असाही निर्धार राजेश पाटील यांनी केला होता.