Rashmi Mane
स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया आता अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार!
उमेदवारांना अर्ज भरतानाच सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार!
मुलाखतीपर्यंत थांबायची गरज नाही.
आधी अर्जातील दाव्यांची पडताळणी मुलाखतीच्या टप्प्यावर होत होती. जर मुलाखतीनंतर अर्जात त्रुटी आढळल्यास पात्र उमेदवारही बाद होत होते.
आता अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. सगळे कागदपत्र भरले नाही तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
एमपीएससीने जाहीर केली 20 कागदपत्रांची यादी ज्यामध्ये शैक्षणिक अर्हता, वय, अधिवास, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड झाली तर अर्ज थेट बाद होणार नाही. उमेदवाराला 7 दिवसांची संधी दिली जाईल. उमेदवारांना ई-मेल, एसएमएस किंवा संकेतस्थळावरील प्रसिद्धिपत्रकाद्वारे सूचना मिळतील.
या नव्या पद्धतीमुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल, वेळेची बचत होईल आणि मुलाखतीच्या टप्प्यावरचा प्रशासकीय भारही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
परिणामी, फक्त पात्र आणि योग्य उमेदवारच पुढील टप्प्यात पात्र ठरणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.