Aslam Shanedivan
खुल्याप्रवर्गातील विद्यार्थी, युवक-युवतींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही.
अमृत संस्थेकडून खुल्या प्रवर्गासाठी हे अर्थसहाय्य शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मिळणार आहे.
यासाठी महाराष्ट्र परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करारनामा करण्यात आला असून जून २०२४ च्या परीक्षेमधील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.
या योजेनेचा उद्देश महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे असा आहे.
यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा असणे अनिवार्य असून त्याने टायपिंग परीक्षा पास केलेली असावी.
तर या विद्यार्थ्यांना अनुक्रमे साडेसहा हजार व पाच हजार ३०० रूपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे.
तर यासाठी इच्छुकांनी अमृत संस्थेच्या संकेतस्थळ www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे संकेतस्थळ www.mscepune.in वरून अर्ज करायचा आहे
प्रोत्साहनात्मक योजनेसंदर्भात अधिक माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, टायपिंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्याचा तपशील