Rashmi Mane
मुंबईच्या सत्ताकारणात महिलांचा दबदबा वाढताना दिसतोय. दोन सक्षम आणि धाडसी महिला आता शहराच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रं आता महिलांच्या हाती आली आहेत. यामुळे प्रशासनात नवा दृष्टिकोन आणि वेगळी कार्यशैली पाहायला मिळणार आहे.
रितु तावडे या मुंबईच्या महापौरपदी विराजमान आहेत. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या सक्रियपणे काम करत आहेत.
मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आश्विनी भिडे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या एवढ्या वर्षाचा प्रशासनात त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.
पाणीपुरवठा, शिक्षण, जिल्हा परिषद आणि मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
या दोन्ही महिलांच्या नेतृत्वामुळे मुंबईतील विकास प्रकल्पांना गती मिळेल. नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवल्या जातील.
या दोन रणरागिणींच्या नेतृत्वामुळे मुंबईत प्रशासनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पुढील काळात शहराच्या विकासाला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.