Maharashtra : राज्य सरकारकडून बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृती

Rajanand More

महिला व बालविकास विभाग

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींसाठी योजना राबविल्या जातात.

Aditi Tatkare | Sarkarnama

घरपोच आहार

विविध योजनांतर्गत घरपोच आहार ही महत्वाकांक्षी योजनाही आहे. बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना पोषणमूल्ये मिळावीत यासाठी ही योजना.

Aditi Tatkare | Sarkarnama

आता चवीलाही प्राधान्य

घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच आता चवीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात स्वतः या नवीन पोषण आहाराचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्तेची पाहणी केली.

Aditi Tatkare | Sarkarnama

व्हेज पुलाव

आहारात आता 'व्हेज पुलाव' आणि 'मल्टीग्रेन पफ' या दोन नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

Aditi Tatkare | Sarkarnama

दर्जा सुधारला

सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’चा दर्जा आणखी सुधारण्यात आला आहे. चव टिकून राहण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. 'मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स' ही पाककृती कायम असेल.

Aditi Tatkare | Sarkarnama

निकषानुसार पोषकतत्वे

केंद्र शासनाच्या निकषानुसार आहारात आवश्यक उष्मांक, प्रथिने आणि सूक्ष्म पोषकतत्त्वे (मायक्रोन्यूट्रिएंट्स) योग्य प्रमाणात समाविष्ट आहेत.

Nutrition | Sarkarnama

कुपोषण घटले

गेल्या तीन वर्षांत राज्यात कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. या नवीन व रुचकर आहारामुळे लाभार्थ्यांची आहाराची स्वीकृती वाढेल आणि कुपोषणाविरुद्धच्या आपल्या लढ्याला नक्कीच अधिक बळ मिळेल, असा तटकरेंना विश्वास.

Child | Sarkarnama

शिफारशींनंतर बदल

हा आहार बदलण्यापूर्वी आम्ही राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय अधिकारी आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. शिफारशींनंतर घरपोच आहारात काही महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

Child | sarkarnama

NEXT : नसीब अपना अपना! आमदार नसताना 'हा' नेता दोनदा कॅबिनेट मंत्री

येथे क्लिक करा.